
शिर्डी | साईबाबा संस्थानचा ऐतिहासिक उपक्रम
ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आता साईबाबा संस्थान पुढे आले आहे. शिर्डीत थेट एमएचटी-सीईटीसाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानने राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस सोबत करार केला आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
११वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लासेस
तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आधुनिक शिक्षण साहित्य
अवघ्या ₹34,999 प्रति वर्ष (बाहेर जिथे जवळपास ₹1,25,000 फी आकारली जाते)
विशेष सवलती:
९०% पेक्षा जास्त गुण (संस्थानच्या शाळेतून दहावी) — संपूर्ण फी संस्थान भरेल
८०% पेक्षा जास्त गुण असलेले अनाथ किंवा एकल पालकांचे विद्यार्थी — संपूर्ण फी माफ
९०% पेक्षा कमी गुण असलेले संस्थानच्या शाळेतील विद्यार्थी — ५०% फी संस्थान भरेल (₹17,500 संस्थानकडून)
इतर शाळांतील विद्यार्थी — फक्त ₹41,299 मध्ये संधी
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे म्हणणे:
“साई संस्थानचा हा उपक्रम म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना व्यावसायिक शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल.”
आता स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांचीही घोडदौड होणार!
साईबाबा संस्थानचा हा उपक्रम समाजाच्या प्रगतीची नवी दिशा ठरणार आहे.