अखेर ठरलं! ठाकरे बंधू एकत्र येणार – ५ जुलै रोजी विजयी जल्लोष मेळावा मुंबईत होणार!

हिंदी सक्तीविरोधातील संघर्षाला यश – आता विजयी जल्लोषाची तयारी!
राजकारणातील दोन महत्त्वाचे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – अनेक वर्षांनंतर ५ जुलै रोजी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. युती नाही, पण मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मिळालेला विजय साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत.
ठाकरे बंधूंच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांनंतर मिळालेले संकेत स्पष्टपणे सांगतात की,
५ जुलै रोजी मुंबईत भव्य विजयी मेळावा होणार!
ठाकरे बंधू एकत्र – दोन दशकांनंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर!
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात यश मिळाल्यानंतरचा हा एकत्रित जल्लोष!
राज ठाकरे म्हणाले –
“मराठी भाषेबाबत तडजोड होऊच शकत नाही. जीआर मागे घेण्यात आला हे लोकशक्तीचं यश आहे. पण सरकारने पुन्हा अशी चूक करू नये. या लढ्याला पक्षीय लेबल लावू नका, हे केवळ भाषेचा, अस्मितेचा प्रश्न आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले –
“मराठी माणूस जागा झाला, म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली. हा मराठी एकजुटीचा विजय आहे. ५ जुलैचा मेळावा म्हणजे मराठी बाणा जागवण्याचा सोहळा आहे.”
सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत जीआर काढताच मराठी जनतेत संताप उसळला होता.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन पेटवले.
परिणामी, सरकारने दोन्ही जीआर रद्द करत माघार घेतली.
५ जुलै, मुंबई – मराठी अस्मितेचा ऐतिहासिक दिवस ठरणार!
विजयाचा जल्लोष, एकत्रित आवाज आणि मराठी माणसाचं बळ पुन्हा एकदा दिसणार!