BIG UPDATE | अहिल्यानगरला मेडिकल कॉलेज होणार पक्कं, आता जागेचा ‘हंट’ सुरू! ![🔍]()
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच सुरु होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेर प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या कॉलेजसाठी योग्य जागा शोधण्याचं मिशन सुरू असून आरोग्य व महसूल विभागाने शहराजवळील ३ ठिकाणी पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
पार्श्वभूमी काय आहे?
- ६ मे २०२५ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी वर्षानिमित्त चौंडी येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
- २३ मे २०२५ – शासनाने 100 सीट्सचे मेडिकल कॉलेज आणि 430 खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता दिली
- सुरुवातीला हे कॉलेज जिल्हा रुग्णालयात सुरू होणार होतं, पण अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रक्रिया लांबली
- आता नवीन जागेचा शोध सुरू, जिल्हाधिकारी आशिया यांच्या सूचनेवरून काम वेगात
डॉ. संजय घोगरे (जिल्हा शल्यचिकित्सक) म्हणाले:
“शहराजवळील ३ ठिकाणांची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. मेडिकल कॉलेजसाठी योग्य जागा अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.”

