मॉल्समध्ये ‘फायर’ सेफ्टी नाही? तर थेट वीज-पाणी कापणार – उदय सामंत यांचा दमदार इशारा!
मुंबई | प्रतिनिधी
राज्यभरातील मॉल्समध्ये वाढणाऱ्या आगीच्या घटना आता थेट सरकारच्या रडारवर! फायर ऑडिट नसेल, तर मॉलची वीज आणि पाणी जोडणी तोडली जाईल, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला आहे.
१० दिवसांची डेडलाइन – नंतर थेट कारवाई!
राज्यातील सर्व मॉल्सना येत्या १० दिवसांत फायर ऑडिट पूर्ण करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. ७५ मॉल्सपैकी २६ ला आधीच नोटीस देण्यात आली होती, पण ५-६ मॉल्सवर आता थेट कडक कारवाईही झाली आहे.
बाकी मॉल्स ‘बंद’ असल्याचं कारण पुढे केलं जातंय, पण सरकारनं स्पष्ट केलंय की, “आता कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!”
‘ब’, ‘क’, ‘ड’ महापालिका क्षेत्रांतही ऑडिट सक्तीचं
सर्व ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापालिकांनाही लवकरच अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश पाठवले जातील. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर “महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षण अधिनियम 2006” अंतर्गत कारवाई होणार.

१० दिवसांची डेडलाइन – नंतर थेट कारवाई!
‘ब’, ‘क’, ‘ड’ महापालिका क्षेत्रांतही ऑडिट सक्तीचं