सावेडीकरांची ‘लाईट’ गेली कुठे?

सबस्टेशन उभं झालं, पण वीज गेली शेंडीला!

⚡
सावेडीकरांची ‘लाईट’ गेली कुठे? सबस्टेशन उभं झालं, पण वीज गेली शेंडीला!

📍 2015 पासून जागा दिली, तरीही सावेडी अंधारात का?

📰 मयूर मेहता | अहिल्यानगर

सावेडी उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि वीज मागणी लक्षात घेता, महावितरणने २०१५ मध्ये महापालिकेकडे अर्धा एकर जागेची मागणी केली होती, पण महापालिकेने ‘दूरदृष्टी’ दाखवत थेट २ एकर जागा दिली. त्यावर भिस्तबाग सबस्टेशन उभारलेही गेले.
पण गंमत अशी की, सावेडीकरांसाठी उभारलेल्या या स्टेशनवरून वीज वडगाव गुप्ता आणि शेंडीसारख्या ग्रामीण भागात वळवण्यात आली!

🚨 सावेडीच्या लोकांना मात्र अजूनही लाईट पुरवठा खंडित, व्होल्टेज कमी, अंधारातच जीवन!
भिस्तबाग, निर्मलनगर भागात थोडी वीज मिळते, पण बाकीचा सावेडी उपनगर अंधारातच.


🔍 सावेडीकरांची अंधारात वाटचाल सुरूच…

महापालिकेने कधीच उपाय केला – २ एकर जागा दिली, पण महावितरणकडून स्मार्ट प्लॅनिंगचा अभाव.
सावेडी, सारसनगरसह प्रोफेसर चौक, बोल्हेगाव, गुलमोहर रोड, रासने नगर, बुरूडगाव रोड – या सर्व ठिकाणी नागरिक हैराण झालेत.


⚠️ महावितरणचा स्पष्टीकरण मोड – ‘जागा दिलीय, पण मागणी जास्त आहे!’

महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण म्हणतात –

“लोकवस्ती वाढतेय, त्यामुळे अजून सबस्टेशन्स हवे आहेत. महापालिकेने नवीन २ ठिकाणी जागा दिली असून काम सुरू आहे.”


⚡ शहराला १० सबस्टेशन्स, तरीही विजेची बोंब?

अहिल्यानगर शहराला सध्या एमआयडीसी, केडगाव, सोलापूर रोड, सावेडी, भिस्तबाग यांसारख्या १० सबस्टेशनवरून वीजपुरवठा होतो.
तरीही सावेडी व सारसनगरसारख्या मुख्य भागांमध्ये अंधाराची लाट कायम.


📢 सावेडीकरांनी आता आवाज उठवायची वेळ आलीये!

 

महापालिकेने जागा दिलीय, आता महावितरणने जबाबदारी घ्या!