निळवंडे धरणातून प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू!
नदीकाठच्या गावांना अलर्ट!
अहिल्यानगर | 7 जुलै
निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज सकाळी ६५७० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे!
सकाळी 9 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू झाला.
पावसाचा जोर वाढल्याने पुढील काही तासांत विसर्गात हळूहळू वाढ होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा –
अकोले
संगमनेर
ओझर बंधाऱ्याच्या खालील गावं
राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नदीकाठची वस्ती
नदीपात्रात ठेवलेली जनावरं आणि साहित्य तात्काळ हलवा!
नदीपात्रात जाणं टाळा, गरज नसताना बाहेर फिरू नका!
कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे (उ.प्र. धरण विभाग, संगमनेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
“पावसाच्या परिस्थितीनुसार विसर्गात बदल होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनाशी संपर्कात राहून दक्षता बाळगावी.”
Share करा ही माहिती तुमच्या गावातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स, स्टोरीज आणि फेसबुकवर!
#NilaWandeLive #PravaraFloodAlert #RainUpdate #AhmednagarNews #MetroNewsMarathi
Prev Post