

‘America Party’ची घोषणा; लोकशाहीत नवा वळणबिंदू?
न्यूयॉर्क | 6 जुलै – टेस्ला आणि स्पेसएक्स चे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर राजकारणात उडी घेतली आहे! अमेरिकेच्या दोन पारंपरिक पक्षांपासून कंटाळलेल्या नागरिकांसाठी मस्क यांनी नव्या ‘
America Party’ ची घोषणा केली आहे.
मस्क यांनी एक्स (माजी ट्विटर) वरून घोषणा करत सांगितले की, “आमच्या लोकांना पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा पक्ष उभारतो आहे.”
ट्रम्पसोबतचे संबंध बिघडल्यानंतर मस्कचा हा मोठा पॉलिटिकल U-turn!
ट्रम्प यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि सर्वात मोठे देणगीदार असलेले मस्क, त्यांच्या कर विधेयकावरून चांगलेच नाराज झाले होते. या वादानंतर त्यांनी सरकारी सल्लागारपद सोडले आणि लोकमत घेत स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मस्कसमोर असलेली मोठी आव्हाने:
- अमेरिका ही द्विपक्षीय राजकीय प्रणाली असलेली राष्ट्र आहे – तिसऱ्या पक्षासाठी तग धरणे कठीण.
- मतदारांची विश्वासार्हता, निधी उभारणी, राज्यनिहाय नोंदणी – ही सर्व प्रक्रिया अजूनही अपूर्ण.
- फेडरल निवडणूक आयोगाकडे अजूनही America Party ची नोंद झाली नसल्याचे CNN ने स्पष्ट केले आहे.
मस्कचं मिशन:
- “पारंपरिक राजकारणाने अमेरिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलं आहे. वेळ आली आहे नवे नेतृत्व, नवा विचार आणि नव्या क्रांतीची!” – एलॉन मस्क
मस्कने एक्सवर घेतलेल्या पोलमध्ये बहुतेक लोकांनी “नवा पक्ष हवा आहे!” असे मत दिले होते. यालाच उत्तर म्हणून त्यांनी शनिवारी आपल्या पोस्टमध्ये America Party ची घोषणा करत खळबळ उडवली.
राजकारणातील गेमचेंजर की आणखी एक प्रयोग? अमेरिका आणि जगभरातील लोकांचं लक्ष आता एलॉन मस्ककडे! 
#ElonMusk #AmericaParty #PoliticalShakeUp #USPolitics #MetroNews #ThirdPartyRevolution #ElonInPolitics #DemocracyRedefined #MuskVsTrump
ट्रम्पसोबतचे संबंध बिघडल्यानंतर मस्कचा हा मोठा पॉलिटिकल U-turn!
मस्कसमोर असलेली मोठी आव्हाने:
मस्कचं मिशन: