डंपर चोरी की LIVE रिटर्न! महसूल प्रशासनाचा ‘स्वॅग’ पाहून माफिया घाबरले!

 CCTV फुटेजमध्ये विश्वास पटारे आणि दोन अनोळखी व्यक्ती डंपर नेताना कैद!

🚨
 डंपर चोरी की LIVE रिटर्न! महसूल प्रशासनाचा ‘स्वॅग’ पाहून माफिया घाबरले!

📍 नेवासे | प्रतिनिधी

“चोरीचा डंपर… आणि २४ तासांत परत ‘जैसे थे’?”
होय! महसूल विभागाच्या कडक कारवाईने वाळू माफियांना चक्क घाम फुटला!


🛑 घटना काय होती?
▪️ 10 जून – मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे यांनी अवैध माती वाहून नेणारा डंपर (MH16 AE 4770) पकडला
▪️ तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात ठेवण्यात आला
▪️ पण… 5 जुलै रोजी डंपर गायब!

🎥 CCTV फुटेजमध्ये विश्वास पटारे आणि दोन अनोळखी व्यक्ती डंपर नेताना कैद!


📞 तहसीलदार संजय बिरादार यांची पोलिसात तक्रार
🚔 तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल
⚖️ प्रशासनाची तातडीची कारवाई
💥 आणि… अवघ्या २४ तासांत डंपर परत मूळ ठिकाणी!


😱 डर का माहौल!
“प्रशासनाची कडक भूमिका पाहून वाळू माफिया हादरले. चक्क डंपर परत आणून उभा केला!”
– परिसरात सध्या हीच चर्चा.


 

📢 संदेश स्पष्ट आहे – कायद्यापुढे कुणीही मोठा नाही!
💪 तहसीलदारांचा ठाम निर्णय
🚫 वाळू तस्करांची धडधड