“CMEGP लोन स्कॅमचा मास्टरप्लान!”
छत्रपती संभाजीनगर – "फक्त ₹48,000 द्या आणि कागदपत्रांशिवाय थेट ₹50 लाखांचे कर्ज मिळवा!" – अशी अफलातून ऑफर देत प्रियंका रवींद्र निकम नावाच्या महिलेनं तब्बल 300 लोकांना गंडवलं!

छत्रपती संभाजीनगर –
“फक्त ₹48,000 द्या आणि कागदपत्रांशिवाय थेट ₹50 लाखांचे कर्ज मिळवा!” – अशी अफलातून ऑफर देत प्रियंका रवींद्र निकम नावाच्या महिलेनं तब्बल 300 लोकांना गंडवलं!
CMEGP योजनेचं नाव पुढे करून 60 कोटींची ‘नो डॉक्युमेंट’ स्कीम राबवली गेली.
लोगांना सांगितलं गेलं की – “हे कर्ज परत फेडायचंही नाही, सरकारचं फ्री गिफ्ट आहे!”
दिव्य मराठीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे धक्कादायक प्रकरण उघड झालं. पैसे घेतानाचे व्हिडिओ पुरावेही समोर आलेत.
सारा परिवर्तन, सावंगी येथील लक्झरी फ्लॅट नं. 7 मध्ये बसून चालली होती ही करोडोंची लूट.
फायनल फिगर – ₹60 कोटींचा घोटाळा!
4 वर्षे चाललेल्या या स्कॅममध्ये अनेक बेरोजगारांना आणि गरजू नागरिकांना जाळ्यात अडकवलं गेलं.
नवी पिढी सावध राहा!
“फुकट कधीच काही मिळत नाही!”
सरकारी योजना नावाखाली चालणाऱ्या या ‘इंस्टंट मनी स्कीम’पासून सावध व्हा!