₹10 मध्ये जेवण, पण अनुदान रखडलंय! शिवभोजन केंद्र चालकांची साडेतीन महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली – 57 लाख मंजूर, अजूनही 40 लाख बाकी!

अहिल्यानगर LIVE अपडेट शिवभोजन थाळीसाठी झगडणाऱ्या गरजूंना दिलासा देणारी बातमी – जिल्ह्यातील ३९ शिवभोजन केंद्रांपैकी ३७ केंद्रे सध्या कार्यरत असून रोज 4,425 थाळ्यांचे वितरण सुरू आहे. मात्र एप्रिलपासून केंद्र चालकांचे एक कोटी रुपयांहून अधिक अनुदान थकीत होतं.

₹10 मध्ये जेवण, पण अनुदान रखडलंय! शिवभोजन केंद्र चालकांची साडेतीन महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली – 57 लाख मंजूर, अजूनही 40 लाख बाकी!

📍
अहिल्यानगर LIVE अपडेट
शिवभोजन थाळीसाठी झगडणाऱ्या गरजूंना दिलासा देणारी बातमी – जिल्ह्यातील ३९ शिवभोजन केंद्रांपैकी ३७ केंद्रे सध्या कार्यरत असून रोज 4,425 थाळ्यांचे वितरण सुरू आहे. मात्र एप्रिलपासून केंद्र चालकांचे एक कोटी रुपयांहून अधिक अनुदान थकीत होतं.

👀 पावसाळी अधिवेशनात 57.71 लाख मंजूर, पण अजूनही 40 लाख रुपयांची वाट पाहताहेत हे केंद्र.

🍱 थाळीमध्ये काय मिळतं?
– 2 पोळ्या
– 1 भाजी
– 1 वाटी भात
– 1 वाटी वरण / आमटी
हे सगळं केवळ ₹10 मध्ये!

📉 काय अडचण आहे?
अनुदान वेळेवर न आल्यामुळे चालकांना खिशातून पैसे घालावे लागत आहेत. त्यामुळे एक चांगली योजना असूनही अडथळे येत आहेत.

💬 लक्षात ठेवा:
शासनाने १५ दिवसांत अनुदान द्यायचं ठरवलं होतं, पण तीन महिन्यांचे पैसे थकवल्यामुळे केंद्र चालक संतापले आहेत.

📢 गरीब, कामगार, विद्यार्थी, वृद्धांसाठी जीवनरेषा ठरलेली ही योजना, पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अनुदान वेळेवर देणं गरजेचं!