“मॅकडॉल सरकार” की महायुती? 

🔥 अजित पवारांचं स्पष्टीकरण, दमानियांचा हल्लाबोल आणि आव्हाडांची जहरी टीका!

🍾
 “मॅकडॉल सरकार” की महायुती? 🔥 अजित पवारांचं स्पष्टीकरण, दमानियांचा हल्लाबोल आणि आव्हाडांची जहरी टीका!

मद्य परवाना घोटाळा का वळतोय अजित पवारांकडे?
पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं:

राज्यात नवे मद्यविक्रीचे परवाने देण्याचा निर्णय घेतलेला नाही. आणि कोणत्याही निर्णयामुळे माझ्या मुलाच्या कंपनीला फायदा झाला असेल, तर पुरावा द्या!

📲 पण नेमकं वाद काय आहे?
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, ४१ विदेशी मद्य उत्पादक कंपन्यांना ३२८ नवे एफएल-२ परवाने मिळणार आहेत. ही परवाने राज्यभरातील ८ महसूल विभागांमध्ये दिली जातील. आणि इथूनच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप सुरू झालाय.

👤 जय पवार, म्हणजेच अजित पवार यांचा मुलगा, हा ‘कॅपोविटज प्रा. लि.’ या मद्यनिर्माण करणाऱ्या कंपनीचा भागीदार आहे.
त्यामुळे विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला की, नव्या परवान्यांच्या निर्णयातून थेट फायद्याचं राजकारण चाललंय!


🚨 दमानिया Vs पवार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या:

ज्यांचं सगळं आहे – साखर कारखाने, मद्यार्क कंपन्या, त्यांचे नातेवाईक त्या कंपन्यांत! आणि आता मद्यविक्रीचं मार्केटही यांचंच? अजित पवारांना मंत्रीपदावर ठेवणं योग्य नाही.


🔥 आव्हाडांचा फुल ऑन अटॅक:

राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट टोला लगावला:

हे महायुती सरकार नाही, हे ‘मॅकडॉल सरकार’ आहे! महाराष्ट्र साधुसंतांचा आहे, तुम्ही त्याला बेवड्यांचा राज्य करू पाहता!


🧃 अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं की, “नवे परवाने नाहीत, स्थलांतर होणं वेगळं आहे. माजी मंत्री भुमरे यांचा परवाना २४ तासात ट्रान्सफर झाला असं नाही – त्याला दीड महिना लागला.”

📅 मात्र २६ जूनला शासन निर्णय जाहीर झाला आणि यावरूनच वाद पेटला.


 

#LiquorLicenseScam #AjitPawar #MackdollSarkar #JayPawar #AnjaliDamania #JitendraAwhad #PoliticalControversy #MetroNewsExclusive