“पाऊस पुन्हा सक्रिय! – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, पावसाची शक्यता वाढली!”
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं हवामान अपडेट!


डिजिटल शेतकरी रिपोर्ट | दि. 16 जुलै 2025
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं हवामान अपडेट!
जुलैच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
रत्नागिरी, मुंबई, पुणे, सांगलीसह अनेक भागात पावसाचे आगमन झाले असून, पुढील ५ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे!
हवामान विभागाचा अलर्ट:
विदर्भ – यलो अलर्ट जारी!
विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता.
पुणे व परिसर – ढगाळ वातावरण, हलकासा पाऊस शक्य.
ज्या तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती चिंतेची:
28 तालुक्यांमध्ये केवळ 25 ते 50% पावसाची नोंद!
यामध्ये समावेश:
- नंदुरबार: तळोदा
- जळगाव: रावेर
- अहिल्यानगर: श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी
- सोलापूर: करमाळा, पंढरपूर
- जालना: परतूर, घनसावंगी
- बीड: बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई, अंबेजोगाई, माजलगाव, परळी
- लातूर: लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर
- धाराशिव: धाराशिव, भूम
- परभणी: परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ, मानवत
- गडचिरोली: सिरोंचा
शेतकऱ्यांसाठी अलर्ट:
मान्सून अद्याप पूर्ण ताकदीत नाही. काही भागात पेरण्या रखडल्यात. अगोदर हवामानाची खात्री करा, मगच पुढचे शेती निर्णय घ्या!
हवामान विभागाचा अलर्ट:
ज्या तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती चिंतेची:
यामध्ये समावेश:
शेतकऱ्यांसाठी अलर्ट: