पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे प्रकल्पाचं स्वागत
पण... "दौंड मार्गे इंटरसिटी तातडीने सुरू करा!" – स्वाती सिरसुल यांची जोरदार मागणी

“दौंड मार्गे इंटरसिटी तातडीने सुरू करा!” – स्वाती सिरसुल यांची जोरदार मागणी
अहिल्यानगर, 16 जुलै –
“नवीन प्रकल्प ठिक, पण तो पूर्ण होईपर्यंत किती वर्षं थांबायचं?”
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सिरसुल यांचा रेल्वे प्रशासनाला थेट सवाल!
मुख्य मुद्दे:
पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे प्रकल्पाला स्वागत, पण वेळ लागणार – ११६ किमी प्रकल्प, ११,००० कोटी खर्च
प्रत्यक्षात स्टेशन, रुळ, जमीन संपादनासाठी लागणार अनेक वर्षं
तोपर्यंत दौंड मार्गे इंटरसिटी रेल्वे तात्काळ सुरू करावी – हजारो प्रवाशांची गरज
प्रवासाचा त्रास:
वाहतूक कोंडीमुळे 120 किमीचा प्रवास = 4-5 तास
इंधनाचा, वेळेचा आणि मन:स्तापाचा मोठा अपव्यय
विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी वर्ग हैराण!
स्वाती सिरसुल यांचा सवाल:
“दौंड जंक्शनजवळ रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असूनही इंटरसिटी अजून का नाही?”
नागरिकांमध्ये नाराजी शिगेला – रेल्वे प्रशासनाकडून कोणताही खुलासा नाही!
आवाहन:
राजकीय नेते, सामाजिक संस्था, नागरिक एकत्र येऊन आवाज उठवा!
“इंटरसिटी आता हवीच!”