नगर तालुक्यात अनोखी राजकीय जुगलबंदी! महाविकास आघाडी + भाजप = उपसरपंच पायउतार
१२ विरुद्ध १ – स्पष्ट बहुमताने अविश्वास!


देहरे | 1 ऑगस्ट 2025 – “राजकारणात काहीही शक्य आहे” हे वाक्य पुन्हा एकदा नगर तालुक्यात सिद्ध झालं आहे. राज्यात जिथे महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांचे विरोधक म्हणून लढत आहेत, तिथे देहरे ग्रामपंचायतीत मात्र दोघांनी हातमिळवणी करत थेट अपक्ष उपसरपंच दीपक जाधव यांना सत्तेवरून खाली खेचलं आहे!
१२ विरुद्ध १ – स्पष्ट बहुमताने अविश्वास!
महाविकास आघाडी आणि भाजप (कर्डिले गट) चे ६-६ सदस्य एकत्र आले आणि एकमेव अपक्ष सदस्य असलेल्या उपसरपंच दीपक जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. ३१ जुलै रोजी पार पडलेल्या विशेष सभेत १२ पैकी १२ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करत जाधव यांना उपसरपंच पदावरून हटवले. खुद्द जाधव हे या वेळी गैरहजर होते.
काय होतं कारण?
जाधव यांच्यावर कामात कुचराई, अधिकारांचा गैरवापर, विकासकामांकडे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा विश्वास न मिळवणं अशा गंभीर आरोपांची मालिकाच होती. त्यामुळेच दोन्ही गटांचा संयम सुटला आणि हा थेट राजकीय ‘ऑपरेशन’ राबवण्यात आला.
एकत्रीतेने बदललेले समीकरण!
या राजकीय युतीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सरपंच कल्याणी घनवटे या भाजपच्या, तर आता उपसरपंच पद महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही युती तात्पुरती होती की नवीन समीकरणांची सुरुवात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पुढचं कोण?
नवीन उपसरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जर ही युती टिकून राहिली, तर दोन्ही गट एकत्र सत्तेत राहणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे देहरे हे लहान गाव असलं तरी, तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात हलचल निर्माण करणारा पॉवरप्ले इथे झाला आहे.
#DeharePolitics #AvisionTwist #MVAplusBJP #VillagePowerGame #MetroPortalExclusive