पुन्हा चर्चेत! वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची नगर जिल्ह्यात ‘कमबॅक एन्ट्री’
पुन्हा नगरमध्ये एंट्री, राजकीय वर्तुळात कुजबूज


अहिल्यानगर | 1 ऑगस्ट 2025 – पारनेरमध्ये एकेकाळी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा नगर जिल्ह्यात परतल्या आहेत. शासनाच्या महसूल विभागाने 30 जुलै रोजी त्यांची बदली करत, त्यांना नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत तहसीलदार पदी नियुक्त केलं आहे.
वादांची पार्श्वभूमी काय होती?
सप्टेंबर 2021 मध्ये पारनेरमध्ये कार्यरत असताना ज्योती देवरे यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. त्या क्लिपमध्ये त्यांनी वरिष्ठांचा दबाव, राजकीय हस्तक्षेप आणि कामातील त्रास याबाबत सविस्तर बोललं होतं. या प्रकरणानंतर जिल्हा खळबळून गेला होता.
चौकशी आणि बदलीचा निर्णय
या प्रकरणावर शासनाने चौकशी समिती नेमली होती. चौकशीनंतर त्यांच्या आरोपांना फारसं तथ्य नसल्याचं सांगत, शासनाने “शासकीय प्रतिमा मलिन केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत” अशा कारणांसह त्यांची बदली जळगावला केली होती.
पुन्हा नगरमध्ये एंट्री, राजकीय वर्तुळात कुजबूज
आता तब्बल चार वर्षांनंतर ज्योती देवरे पुन्हा नगरमध्ये परतल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात तहसीलदार पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही बदली राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
लोक विचारतात – दुसरी संधी की धोका पुन्हा?
ज्या महिला अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर शासनाने ताशेरे ओढले होते, त्या पुन्हा त्याच जिल्ह्यात का? हा एक प्रश्न आहे. पण काहींचं मत आहे – प्रत्येकाला दुसरी संधी मिळायलाच हवी.
सोशल मीडियावर #JyotiDevre ट्रेंडमध्ये!
या बदलीनंतर सोशल मीडियावर #JyotiDevre #TehsildarReturns #ParnerControversy असे हॅशटॅग ट्रेंड होत असून, पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रशासनात वादळ येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
#नगरPolitics #ControversialComeback #MetroPortalExclusive