“फेक नोटांचा बादशाह!”
बनावट ५०० च्या नोटांचा मास्टरप्लॅन उघड! पोलिसांच्या ‘ऑपरेशन फेक करन्सी’ची मोठी कामगिरी!
“फेक नोटांचा बादशाह!”
बनावट ५०० च्या नोटांचा मास्टरप्लॅन उघड! पोलिसांच्या ‘ऑपरेशन फेक करन्सी’ची मोठी कामगिरी!
अहिल्यानगर: बनावट नोटांचं महाजाळ अखेर पोलिसांनी फोडलं! छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तब्बल ६० लाखांच्या बनावट नोटा आणि २ कोटींपेक्षा अधिक कच्चा माल पोलिसांनी पकडला आहे.
‘ऑपरेशन फेक करन्सी’मध्ये सात जणांना अटक झाली असून, या रॅकेटचा मेंदू – अंबादास ससाणे (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव) सध्या फरार आहे. पोलिसांचा दावा आहे की, २०१५ पासून ससाणे हेच ‘फेक नोटांचे किंगपिन’ आहेत!
मास्टरप्लॅनचं कोडं!
मशीन मागवलं भोपाळहून,
कागद मागवला मुंबईहून,
सिमकार्ड घेतलं बनसोडेच्या नावावर,
नोटांवर सुरक्षेच्या हू-ब-हू नक्कल!
या बनावट नोटा इतक्या हुबेहुब होत्या की खऱ्यापासून वेगळ्या ओळखणं अवघड! किरकोळ व्यवहार, चहाच्या टपऱ्या, किराणा दुकाने यांमध्ये या नोटा फिरवल्या जात होत्या.
एक दुकानदार झाला ‘गुप्तहेर’!
अहिल्यानगरजवळील आंबिलवाडीतील एका छोट्या दुकानदाराने सावधगिरी बाळगली आणि पोलिसांना माहिती दिली. हीच माहिती पुढे ‘फुल्ल टू’ क्राइम एक्सपोज ठरली!
सतर्कतेचा सायरन!
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावर जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना दिल्या जात आहेत. बनावट नोटा मिळाल्यास तात्काळ माहिती द्या!
पोलिसांकडून नागरिकांनाही आवाहन – “रोख व्यवहार करताना नोटा पारखून घ्या!”
कायद्याची ‘सत्यनारायण कथा’ नाय… थेट तुरुंगवास!
IPC कलम १७९ व १८० नुसार –
बनावट नोटा वापरणे, साठवणे, विकणे = गंभीर गुन्हा
शिक्षा: १० वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आजीवन कारावास!
अजून उलगडायचं बाकी आहे!
‘फेक नोटांचा डॉन’ ससाणे गजाआड झाल्यावरच उरलेले क्राईम नेटवर्क, गुंतवणूकदार, पंटर यांचं संपूर्ण जाळं बाहेर येणार आहे!

मास्टरप्लॅनचं कोडं!
एक दुकानदार झाला ‘गुप्तहेर’!
सतर्कतेचा सायरन!
कायद्याची ‘सत्यनारायण कथा’ नाय… थेट तुरुंगवास!
अजून उलगडायचं बाकी आहे!