“पारनेरला मिळणार ‘फायर पॉवर’!

सुपा एमआयडीसीत उभं राहतंय आधुनिक अग्निशमन केंद्र!"

🔥
🚨 “पारनेरला मिळणार ‘फायर पॉवर’!

सुपा एमआयडीसीत उभं राहतंय आधुनिक अग्निशमन केंद्र!”

📍 सुपा, पारनेर तालुका | नगर सह्याद्री

पारनेरकरांनो, आता आगीच्या संकटावर मिळणार ‘फुल कंट्रोल’!
सुपा एमआयडीसीत उभारलं जात असलेलं अत्याधुनिक अग्निशमन केंद्र लवकरच प्रत्यक्षात येणार आहे आणि सध्या त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. ८०% हून अधिक काम पूर्ण! 🔧🏗️


🧑‍🚒 या सुविधेमुळे काय बदलणार?
▪️ संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी हे केंद्र ठरेल वरदान!
▪️ २८ अग्निशमन जवान आणि २ अधिकारी राहण्यासाठी स्वतंत्र निवास
▪️ २ अग्निबंब गाड्या, १ अॅम्बुलन्स आणि बोलेरो जीप सज्ज
▪️ पुढच्या टप्प्यात अजून वाहने आणि सुविधांचा समावेश होणार
▪️ २ एकरवर पसरलेलं मजबूत आणि व्यावसायिक पायाभूत बांधकाम


📅 ३० जुलै रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी:
कामाची गुणवत्ता आणि वेग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं.
याच वेळी सागर मैड यांनी आमदार काशीनाथ दाते यांचाही संपर्क अधिकाऱ्यांशी साधून दिला.

🚨 “अग्निशमन केंद्र लवकरच लोकसेवेसाठी सुरू होणार” – अधिकृत आश्वासन


📜 पार्श्वभूमी:
२०१७ पासून सुपा परिसरासाठी फायर स्टेशनची मागणी सातत्याने सागर भास्करराव मैड करत होते. अभ्यासपूर्ण मागणी, योग्य ठिकाणी पाठपुरावा आणि नेत्यांचं सहकार्य यामुळे हा प्रकल्प साकारतोय.

 

🙏 यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे