पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री! राज्यात वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार!
7 आणि 8 ऑगस्ट 2025 (गुरुवार-शुक्रवार) या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री! राज्यात वीजा
आणि ढगांच्या गडगडाटासह
हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार!
महाराष्ट्र वेदर अपडेट | 7-8 ऑगस्ट 2025
राज्यभर सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतलीय
आणि सूर्यदेव बाप्पा आपलं जोरदार दर्शन देतायत!
तापमानही सर्रास 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं दिसतंय – त्यामुळे खरिप हंगामाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्यात 
पण आता चिंता नाही! हवामान विभागाने दिलाय दिलासा 
7 आणि 8 ऑगस्ट 2025 (गुरुवार-शुक्रवार) या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये
पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पावसाचा जोर कुठे राहणार?
मध्य महाराष्ट्र: पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा: बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली
कोकण: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड
विदर्भ: यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया
या जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट
, ढगांचा गडगडाट
, आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं Yellow Alert
जारी केला आहे – म्हणजेच नागरिकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे!
शनिवार (9 ऑगस्ट) – पावसाचा जोर थोडा कमी होणार, पण कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे.
रविवार (10 ऑगस्ट) – विदर्भात पुन्हा वीजांसह पावसाची शक्यता!
शेतकरी बांधवांसाठी ही मोठी बातमी आहे! पेरण्या उशिराने झाल्या असतील, तरी हा पाऊस पीक भरभराटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल 
#MaharashtraWeather #RainAlert #पाऊसपुन्हाआला #FarmersRelief #MonsoonUpdate #MetroWeatherAlert
ही माहिती शेअर करा – तुमच्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे का, हे कळवा कॉमेंटमध्ये! 