BSP चा दमदार एलान – स्थानिक स्वराज्य निवडणुका 100% स्वबळावर!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अजून हॉट झाल्या आहेत,

BSP चा दमदार एलान – स्थानिक स्वराज्य निवडणुका 100% स्वबळावर! 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अजून हॉट झाल्या आहेत, कारण बहुजन समाज पक्ष (BSP) ने मोठा निर्णय घेतला आहे – या निवडणुका आम्ही कुणाच्याही मदतीशिवाय, थेट स्वबळावर लढवणार! 

पश्चिम महाराष्ट्रातून मोठा संदेश!
पक्षाचे महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी स्पष्ट केलं की,
“प्रत्येक शहरात स्वबळावर सत्ता मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”
छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्
चिन्ह असलेल्या BSP च्या निळ्या झेंड्याखाली एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरू!
प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत आणि नगर परिषद क्षेत्रात BSP ची स्वतःची ताकद आहे.
वॉर्ड, वस्ती आणि ब्लॉक लेव्हलवर पक्षाची रचना निवडणुकीसाठी कार्यान्वित.
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या जोरावर विजयाचा आत्मविश्वास.
डॉ. चलवादी म्हणाले –
“सत्ताधारी आणि विरोधकांनी समाजकारणाच्या नावाखाली फक्त राजकारण केलं आहे. सर्वसामान्यांच्या कामांचा विसर पडला आहे.”
प्रस्थापित पक्षांना टार्गेट
प्रस्थापित पक्षांवर लोकप्रतिनिधी पळवण्याचे आणि पक्ष फोडण्याचे आरोप.
“BSP हा 100% समाजकारण करणारा पक्ष आहे आणि आता आम्ही स्थानिक पातळीवर पूर्ण तयारीत आहोत.”
मतदारांनी या वेळी प्रस्थापित पक्षांना धडा शिकवावा, अशी थेट हाक.
BSP चा कॅडर फुल पॉवरमध्ये!
BSP कार्यकर्ते, ब्लू झेंडा आणि हत्ती चिन्हासह मैदानात उतरण्यास तयार आहेत. 
ही निवडणूक फक्त सत्ता मिळवण्याची नाही, तर समानतेची लढाई जिंकण्याची आहे. 
तुमचं मत काय? BSP ला स्वबळावर चान्स आहे का? की प्रस्थापित पक्ष अजूनही टॉपवर राहतील?
कमेंट करून सांगा! 

#BSP #BahujanSamajParty #LocalElections #MaharashtraPolitics #BreakingNews #HathiHamaraSathi 


पश्चिम महाराष्ट्रातून मोठा संदेश!
संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरू!
प्रस्थापित पक्षांना टार्गेट