अहिल्यानगर पोलिसांत खळबळ!
लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला – 20 हजार मागणी, 3 हजार घेताच सापळा यशस्वी!
अहिल्यानगर / श्रीगोंदा
अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलात मोठा धक्का – पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिवाजी घोडे (वय 32) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं!
काय घडलं?
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराच्या मुलाच्या प्रकरणात “मध्यस्थी” करून, मोबाईल परत देण्यासाठी 20 हजारांची लाच मागणी, शेवटी तोडजोडीनंतर 3 हजार रुपयांवर डील.
सापळा कारवाई –
11 व 12 ऑगस्ट रोजी पडताळणीनंतर, 12 तारखेला स्वतःच्या हाताने 3 हजारांची लाच घेताना कॉन्स्टेबलला ACB पथकाने जागीच ताब्यात घेतले.
गुन्हा नोंदणी –
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
कारवाई पथक –
- DYSP अजित त्रिपुटे (तपास प्रमुख)
- पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे
- पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड, वैभव सुपेकर
- चालक हवालदार हारून शेख, हवालदार लाड
ACB चं आवाहन –
“कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर तात्काळ ACB ला संपर्क करा.”
संपर्क क्रमांक:
- दुरध्वनी: 0241-2423677
- मोबाईल: 8329701344
- टोल फ्री: 106

लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला – 20 हजार मागणी, 3 हजार घेताच सापळा यशस्वी!