जामखेड एसटी डेपो ठप्प! प्रवाशांची तासन्तास वाट – कारण फक्त डिझेलची कमतरता!
११ ऑगस्ट दुपारनंतर – डिझेल संपलं! बस बंद! डेपो शांत!


जामखेड : महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं जामखेड
– इथून पुणे, मुंबई, बारामती, करमाळा, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर… असं कुठेही जायचं म्हटलं, तर २४ तास एसटी बस
तयार! पण या वेळी “प्रवाशांच्या सेवेसाठी” असलेलं एसटीचं ब्रीदवाक्य अक्षरशः धुळीत मिळालं.
११ ऑगस्ट दुपारनंतर – डिझेल संपलं! बस बंद! डेपो शांत!
एकूण ५१ बसेस थेट डेपोत उभ्या, प्रवासी मात्र स्टेशनवर, रस्त्यावर ताटकळत
. शहर-गाव दोन्हीकडे सेवा ठप्प झाली. रोज मिळणाऱ्या लाखभर रुपयांचं उत्पन्न थेट बुडालं
.
या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट हल्ला केला –
“जामखेड एसटी डेपोसाठी डिझेल टँकर मंगळवारी ५ वाजता यायचा होता, पण आला नाही. डेपो बंद करण्याची वेळ आली. रॅपिडोचं इंधन मिळतं, पण एसटी डेपो ठप्प! मुख्यमंत्री म्हणाले होते – महाराष्ट्र थांबणार नाही, पण एसटी मात्र थांबली आणि ठप्प झाली!”
चालक-वाहकांनाही काही महिन्यांपासून डिझेल तुटवड्याचा त्रास आहे. चुकीच्या नियोजनामुळे
बसेस रेंगाळत उभ्या राहतात आणि प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणच्या बसची वाट पाहावी लागते. वाढलेले डिझेल दर आणि खराब रस्ते या दोन्हीमुळे आगाराचं आर्थिक गणित बिघडलं
.
१२ ऑगस्ट दुपारी उशिरा डिझेल टँकर आल्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाली, पण तोपर्यंत प्रवाशांचा संयम संपला होता. काहींना महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स, काहींना शाळा-नोकरी, तर काहींना प्रवासाचे तिकीट वाया गेलं.
लोकांचे शब्द :
“असं झालं तर एसटीवर विश्वास ठेवायचा कसा?”
“सरकार फक्त जाहिराती करते, जमिनीवर सेवा ठप्प!”
नव्या पिढीचा मेसेज :
सरकारने “थांबणार नाही” म्हटलं, पण जामखेडने अनुभव घेतला – इंधन संपलं, सेवा संपली!


#JamakhedST #FuelCrisis #STProblems #MaharashtraStop