मुंबई–गोवा महामार्ग अपडेट! गणेशोत्सवात प्रवास होणार ‘एक्सप्रेस’
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी BIG NEWS आलीये!

मुंबई–गोवा महामार्ग अपडेट! गणेशोत्सवात प्रवास होणार ‘एक्सप्रेस’
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी BIG NEWS आलीये! 
गणेशोत्सव म्हणजे कोकणाकडे जाणाऱ्या लाखो भाविकांचा उत्साह, पण त्याचसोबत येतो ट्रॅफिक जॅमचा त्रास.
अजूनही मुंबई–गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात भाविकांना तासन्तास कोंडीत बसावं लागतंय. पण यावर्षी रायगड जिल्हा प्रशासनाने एक गेम-चेंजिंग निर्णय घेतलाय! 
वाहतुकीत मोठा बदल!
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केलंय की 23 ऑगस्टपासून मुंबई–गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 
बंदी राहणार आहे. यामागचं उद्दिष्ट एकच – भाविकांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित करणं.
बंदीचं वेळापत्रक:
23 ऑगस्ट संध्याकाळी 6 ते 29 ऑगस्ट रात्री 12 – अवजड वाहनं बंद
2 सप्टेंबर सकाळी 6 ते 4 सप्टेंबर रात्री 8 – अवजड वाहनं बंद
6 सप्टेंबर सकाळी 8 ते 8 सप्टेंबर रात्री 8 – अवजड वाहनं बंद
16 टनपेक्षा जास्त वजनाची वाहनं या काळात महामार्गावरून जाणार नाहीत. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि गणेशभक्तांना ट्रॅफिकच्या जाळ्यात अडकावं लागणार नाही. 
फायदे:
प्रवासाचा वेग वाढेल 

अपघाताची शक्यता कमी होईल 
भाविकांना वेळेत गंतव्यस्थळी पोहोचता येईल 
ट्रॅफिक जॅममधून सुटका 
गणपती बाप्पा मोरया! 
या निर्णयामुळे मुंबईहून कोकणाकडे, आणि पुढे गोव्याला जाणाऱ्या हजारो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रशासनाचा हा पाऊल खरंच लोकांच्या मनाला भिडणारं आहे.
तर, भाविकांनो, बॅग पॅक करा, मूर्ती सजवा आणि निघा गणपतीच्या स्वागताला – यंदा प्रवास होणार कटकटीशिवाय!. 

23 ऑगस्ट संध्याकाळी 6 ते 29 ऑगस्ट रात्री 12 – अवजड वाहनं बंद