BREAKING TWIST | बेस्ट निवडणुकीत ‘मिडनाईट शॉक’ – ठाकरे बंधू क्लीन बोल्ड, शशांक राव पॅनेलचा धडाकेबाज कब्जा!

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत भन्नाट ट्विस्ट! सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनेल आघाडीवर होतं. पण मंगळवारी मध्यरात्री झालेल्या री-काउंटिंग ड्राम्यात निकालच उलटला!

📰
BREAKING TWIST | बेस्ट निवडणुकीत ‘मिडनाईट शॉक’ – ठाकरे बंधू क्लीन बोल्ड, शशांक राव पॅनेलचा धडाकेबाज कब्जा!

मुंबई :
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत भन्नाट ट्विस्ट! 🔥 सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनेल आघाडीवर होतं. पण मंगळवारी मध्यरात्री झालेल्या री-काउंटिंग ड्राम्यात निकालच उलटला! 😲

👉 शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांना धक्का देत तब्बल 14 जागांवर क्लीन स्वीप केलं, तर सहकार समृद्धी पॅनेलला फक्त 7 जागा मिळाल्या.
👉 सर्वात मोठा धक्का म्हणजे, ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल एकही जागा जिंकू शकलं नाही! ⚡

गेल्या 9 वर्षांपासून ठाकरे गटाचं एकहाती वर्चस्व असलेली बेस्ट पतपेढी आता पूर्णपणे शशांक राव गटाच्या ताब्यात गेली आहे. या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

📌 चर्चेत असलेली कारणं :

  • कामगार संघटनांमध्ये शशांक राव यांचा दमदार पाय
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने केलेली लढाई
  • जनतेनं ठाकरे बंधू आणि महायुतीला दिलेला “नो व्होट” सिग्नल

🏆 शशांक राव पॅनेलचे विजयी उमेदवार (14)

आंबेकर मिलिंद शामराव, आंब्रे संजय तुकाराम, जाधव प्रकाश प्रताप, जाधव शिवाजी विठ्ठलराव, अम्मुंडकर शशिकांत शांताराम, खरमाटे शिवाजी विश्वनाथ, भिसे उज्वल मधुकर, धेंडे मधुसूदन विठ्ठल, कोरे नितीन गजानन, किरात संदीप अशोक, डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव), धोंगडे प्रभाकर खंडू (SC/ST), चांगण किरण रावसाहेब (भटक्या विमुक्त जाती), शिंदे दत्तात्रय बाबुराव (OBC).


🏆 सहकार समृद्धी (प्रसाद लाड गट) विजयी (7)

रामचंद्र बागवे, संतोष बेंद्रे, संतोष चतुर, राजेंद्र गोरे, विजयकुमार कानडे, रोहित केणी (महिला राखीव), रोहिणी बाईत.


 

👉 हा निकाल म्हणजे एकदम गेम चेंजर! ठाकरे बंधू ‘झिरो’वर आउट झाल्यानं राजकीय गलियार्‍यात जोरदार चर्चा रंगली आहे. 🚨