BIG BREAKING | अहिल्यानगर पोलिसांचा धडाका! सय्यद घोडपीर दर्ग्याची तोडफोड करणारे आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
अहिल्यानगर : शहरातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा कट पोलिसांनी वेळेत उधळला!
Share
BIG BREAKING | अहिल्यानगर पोलिसांचा धडाका! सय्यद घोडपीर दर्ग्याची तोडफोड करणारे आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद
अहिल्यानगर : शहरातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा कट पोलिसांनी वेळेत उधळला!
24 ऑगस्ट रोजी पहाटे देशपांडे हॉस्पिटल जवळील सय्यद घोडपीर दर्ग्यावर अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकारामुळे हिंदू-मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. घटनेमुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून कोतवाली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुन्हा रजि. नं. 761/2025 अंतर्गत आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 298, 299, 324(4), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली व तोफखाना पोलिसांची विशेष पथके तयार केली. फक्त काही तासांत तपास सुरू झाला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दर्ग्याची तोडफोड करण्यासाठी वापरलेला JCB मशीन हाती लागला. मालक अरुण गोविंद खरात यांना चौकशीसाठी बोलावल्यावर धागेदोरे मिळाले. त्यातून जेसीबी चालक बबलु पाल (रा. भुतकरवाडी) याला पकडले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दुसरा आरोपी योगेश झोंड (रा. भुतकरवाडी) यालाही जेरबंद केले. इतर आरोपी सचिन दारकुंडे, दत्ता गायकवाड व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे शहरात संभाव्य तणाव टळला असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
पोलिसांची वेळेत केलेली ही कारवाई म्हणजे धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे.