Major Blow to the Bahujan Movement in Ahilyanagar! ⚡✊
अहिल्यानगरच्या बहुजन चळवळीवर मोठा आघात!
Share
अहिल्यानगरच्या बहुजन चळवळीवर मोठा आघात!
अचानक आलेल्या दुःखद बातमीने संपूर्ण समाज सुन्न झाला आहे. बहुजन शिक्षण संस्थेच्या संबोधी विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेतेनितीन प्रभाकर कसबेकर (वय ५०) यांचे काल रात्री अपघाती निधन झाले.
नितीन कसबेकर हे केवळ एक नेते नव्हते, तर फुले–शाहू–आंबेडकर–साठे चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते. समाजाच्या सुख–दुःखात नेहमी धावून जाणारे, गरीब–शोषितांच्या प्रश्नांसाठी लढणारे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आज आपल्यात राहिले नाही, ही बातमी ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, नातेवाईक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. ते प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार प्रीतमकुमार कसबेकर यांचे छोटे बंधू होते. कला, शिक्षण आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये कसबेकर कुटुंबाचे योगदान मोठे असून, नितीन कसबेकर यांच्या जाण्याने ही परंपरा मोठ्या वेदनेतून जात आहे.
त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सिद्धार्थनगर येथील ख्रिस्त कब्रस्तान येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.
त्यांच्या जाण्याने फुले–शाहू–आंबेडकरी चळवळ, बहुजन शिक्षण संघ परिवार आणि संपूर्ण जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी एकच भावना दिसत आहे – “नेहमी आमच्यासोबत असणारे बंधू आज आम्हाला सोडून गेले, ही भरून निघणारी उणीव नाही!”
Metro Portal वरील सर्व वाचकांच्या वतीने आम्ही नितीन कसबेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो!