✨🚩 Navratri 2025 Special Story – तुळजाभवानीचे माहेरघर, बुऱ्हानगर! 🚩✨
आई तुळजाभवानी बालरूपात बुऱ्हानगर येथे प्रकटल्या होत्या.
Navratri 2025 Special Story – तुळजाभवानीचे माहेरघर, बुऱ्हानगर! ![🚩]()
![✨]()
नवरात्र म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात त्या आपल्या देवीच्या मंदिरे
महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, सप्तश्रृंगी, वणीची देवी अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या राज्यात असं एक प्राचीन मंदिर आहे जे तब्बल 1100 वर्षं जुना इतिहास जपून आहे!
हे मंदिर ज्या गावात आहे, त्या गावाला आजही आई तुळजाभवानीचं माहेरघर मानलं जातं.
होय! आपण बोलतोय बुऱ्हानगर (अहिल्यानगरजवळचं गाव) बद्दल
.
देवीचा इतिहास
कथा अशी आहे की, आई तुळजाभवानी बालरूपात बुऱ्हानगर येथे प्रकटल्या होत्या. त्या काळात त्या भगत कुटुंबाकडे तब्बल 12 वर्षे वास्तव्यास होत्या. लहानू भगत यांनी स्वतःची जमीन विकून या मंदिराची निर्मिती केली
. आजही भगत कुटुंबाची 30 वी पिढी या मंदिराची पूजा-अर्चा आणि व्यवस्थापन करते.
त्यामुळेच तुळजापूर हे सासर तर बुऱ्हानगर हे माहेर मानलं जातं.
या बालस्वरूपामुळे देवीला “अंबिका देवी” असंही संबोधलं जातं.
नवरात्र उत्सव
इथं गेल्या 1100 वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
-
पहिल्या दिवशी गावातून मानाच्या घटांची आणि धर्मध्वजांची मिरवणूक निघते
![🚩]()
-
तिसऱ्या माळेला भरते पलंग पालखी यात्रा – जशी तुळजापूरमध्ये होते, तशीच इथेही!
-
दररोज सकाळी देवीचा शृंगार
आणि महाआरती, रात्री शेजारती ![🌙]()
-
अष्टमीला होमहवन
![🔥]()
-
विजयादशमीला महापूजा आणि सीमोल्लंघन
![✨]()
-
कोजागिरी पौर्णिमेलाही विशेष पूजा
![🌕]()

Navratri 2025 Special Story – तुळजाभवानीचे माहेरघर, बुऱ्हानगर!
महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, सप्तश्रृंगी, वणीची देवी अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या राज्यात असं एक प्राचीन मंदिर आहे जे तब्बल 1100 वर्षं जुना इतिहास जपून आहे!
हे मंदिर ज्या गावात आहे, त्या गावाला आजही आई तुळजाभवानीचं माहेरघर मानलं जातं.
.
देवीचा इतिहास
त्यामुळेच तुळजापूर हे सासर तर बुऱ्हानगर हे माहेर मानलं जातं.
नवरात्र उत्सव
आणि महाआरती, रात्री शेजारती 

सुरक्षा आणि व्यवस्था
तब्बल 25 CCTV कॅमेरे मंदिर परिसरात बसवले जातात. भगत कुटुंबीय स्वतः सर्व व्यवस्था बघतात
.
खास आकर्षण
.