झाकिर वलीअहमद खान यांचे सोमवार दि.10 रोजी दुःखद निधन
जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सामान्य प्रशासन शाखेमध्ये अव्वल कारकून या पदावर कार्यरत असलेले झाकिर वलीअहमद खान (वय 56 वर्षे) यांचे सोमवार दि.10 रोजी कोरोना साथरोगाच्या संसर्गाने दुःखद निधन झाले.
दिवंगत अव्वल कारकून झाकिर वलीअहमद खान यांनी कोरोना साथ रोगाच्या सध्याच्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये वेळोवेळी आपले कर्तव्य सचोटीने बजाविले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाकिर वलीअहमद खान यांची प्रतिमा प्रामाणिक व
कर्तव्यदक्ष कर्मचारी अशी होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने अहमदनगर जिल्हा महसूल प्रशासनाने
एक कर्तव्यदक्ष कर्मचारी गमाविला आहे.
झाकिर वलीअहमद खान, अव्वल कारकून यांना जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर आणि जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली. अर्पण करण्यात आली. व झाकिर वलीअहमद खान यांचे निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांचे कुटूंबियास दयावी अशी प्रार्थना करण्यात आली.
प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .