भारताला सहावं पदक; कुस्तीपटू बजरंग पुनियाची कांस्यपदकाला गवसणी

कझाकस्तानच्या डोअलेट कोलकेस्तेवचा 8-0 अशा फरकाने पराभव

अहमदनगर (वैष्णवी घोडके )

टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनीयाने जबरदस्त कामगिरी करत कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. 65 किलो वजन गटात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या खेळाडूचा पराभव केला.

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

कझाकिस्तानच्या पैलवानाला चितपट करत बजरंग पुनिया याने इतिहास रचला. भारताच्या खात्यात आतापर्यंत पाच पदकं असून, पुनियामार्फत भारताला मिळालेलं हे सहावं पदक आहे.

 

 

 

 

 

ब्रांझ पदकासाठी झालेल्या सामन्यात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या डोअलेट कोलकेस्तेवचा 8-0 अशा फरकाने पराभव केला.

बजरंग पुनियाला स्वर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र उपांत्य फेरीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या पराभवातून सावरत बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत शानदार कामगिरी करून देशाला पदक मिळवून दिलं.