रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु,अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नगर शहरात भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम सुरु असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे . असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद बडे यांनी केला आहे . याकडे संबंधित अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे
भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम सुरु आहे . या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या शरद बडे यांनी पाहणी केली असता मातीवर डांबर न टाकता खडी व कच यांचे एकत्रित केले ते मिश्रण रस्तावर टाकून नागरिकांचा पैशाचा दुरुपयोग संबंधित ठेकेदार करत आहे . शासनाने ठरवून दिलेले नियम संबंधित ठेकेदार धाब्यावर बसून अत्यंत निकृष्ट प्रतीचा रस्ता तयार करण्याचे काम करत आहे .या रस्त्याची पडताळणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे .