न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा .
पोवाडा आणि शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन .
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज च्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला .
कार्यक्रमामध्ये प्रथम छत्रपतींच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले . त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले . यावेळी आरती , पोवाडा असे कार्यक्रम तसेच शिवचरित्र व्याख्यान यांचं आयोजन केले होते . कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अशी माहिती न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य झावरे सर यांनी दिली . या शिवजयंती सोहळ्याच्या नियोजनचि जबाबदारी संदेश शिंदे आणि हर्षवर्धन काकडे यांनी पार पाडली . या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच या कार्यक्रमास प्राचार्य झावरे सर , उपप्राचार्य आठरे सर , सागडे सर , कळमकर सर आदि उपस्थित होते .