शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .
नाशिक येथील विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मंडळात मूर्तीची प्रतिष्ठापणा .
अहमदनगर –
नाशिक येथील विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मंडळात ही मूर्ती कायमस्वरूपी विराजमान होणार आहे
दोन दिवसांपूर्वी या मूर्तीचे काम पूर्ण होऊन ती नाशिकला रवाना झाली . गणेश चतुर्थीच्या दिवशी ही मूर्ती नाशीक येथील शिवसेना मित्र मंडळाच्या मंडपात तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .

64 कालांची देवता असलेलले श्री गणेश हे प्रमोद कांबळे यांचे नेहमीच अरराध्य राहिलेले आहेत . त्यांनी बालपणी जेव्हा कुंचला हातात धरला नव्हता तेव्हा त्यांनी आपल्या शाळेत एका भिंतीवर कोळशाने गणेशाचे चित्र साकारले होते .कलासाधनेत मग्न असलेल्या प्रमोदजींच्या कलेची ख्याति जगभरात पोहोचल्यानंतर महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्राने त्यांना गणेश स्थापनेच्या दिवशी पहिल्या संपूर्ण पानावर गणपतीचे चित्र साकारण्याची संधी दिली होती.प्रमोदजी आकर्षक लग्नपत्रिकांचे डिजाइन करून देतात तिथेही आशयानुसार विविध प्रकारचे गणपती रेखाटततात .
नगरच्या वैभवात भर घालणारे कॉफी मग म्यूझियम
नाशिकच्या विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मंडळासाठी 25 फूटी विशाल गणेश साकारण्याची ऑर्डर त्यांना मिळाली त्यावेळी तब्बल तीन महिन्यांपासून प्रमोद्जी यांच्या गुलमोहर रोडवरील स्टुडिओत त्यांचे सुपुत्र चित्रकार शुभंकर कांबळे त्यांची स्नुषा तसेच राज्याच्या कांनाकोपर्यातून त्यांनी बोलावलेल्या पंधरा कलाकारांची टीम अहोरात्र ही फायबर ची गणेशमूर्ती साकारण्यात मग्न होती . या मूर्तीचे काम पूर्णत्वास येत असताना शेवटचे चार दिवस
नाशिकहून विनायक पांडे यांचे सुपुत्र ऋतुराज पांडे आणि तब्बल 40 शिवसैनिक नगर मध्ये थांबून राहिले होते . त्यांच्या देखरेखीखाली मूर्तीचे काम पूर्ण झाले . विशाल गणेशाची सुबक मूर्ती पाहून सर्वच आनंदित होते .
नगरकरांनीही त्यांच्या कलेची आणी कलात्मक मूर्तिची तोंड भरून स्तुति केली . गुलमोहर रोडवरून जाताना मूर्ती दृष्टिक्षेपात येताच मूर्तीसमोर आवर्जून थांबत आणि त्यांना सेलफी काढण्याचा मोह आवरत नसे .
नगरसाठीही अशाच प्रकारची भव्य मूर्ती साकारावी अशी अपेक्षा अनेकांनी प्रमोदजी यांच्याकडे व्यक्त केली . नाशिकच्या शिवसेना युवक मित्रमंळाने या मूर्तीला सजवण्यासाठी 40 किलो चांदीचे दागिने
आणि सोन्याच्या अंगठ्या अर्पण केल्या . मूर्तीसाठी खास वाराणसीहून हार तयार करून आणला असल्याच ऋतुराज पांडे यांनी सांगून प्रमोदजींच्या कलाकृतीची त्यांनी तोंड भरून स्तुति करून समाधान व्यक्त केल .
आपल्या कलेद्वारे हटके कलाकृती निर्माण करण्याचा प्रमोदजींचा सतत प्रयत्न असतो . पंचवीस फूटी गणेशाची मूर्ती साकारताना त्यांनी मूर्तीचे सर्व बारकावे अधोरेखित करून प्रमोदजींनी भव्य अशी गणेशाची मूर्ति साकारली
याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे .