शहरातील सर्व प्रकारच्या होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू

विनापरवाना होर्डिंग सहपरवानाधारक होर्डिंग ही तपासणार

शहरातील प्रमुख रस्त्यांलगत खाजगी इमारतींवर उभारलेल्या सर्व होर्डिंग तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व महापालिका आयुक्तांमार्फत शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्या होर्डिंगला परवानगी नाही, तसेच धोकादायक वाटणारे होर्डिंग हटवण्यात येतील. नियमानुसार परवानगी दिलेल्या नसतील तर अशा परवानगी रद्द केल्या जातील. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. दरम्यान दोन दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई येथे वादळामुळे मोठा जाहिरात फलक पडून त्याखाली अनेकांचे बळी गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील होल्डिंगची तपासणी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडे अवघ्या 384 होर्डिंगची नोंद उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनाने 2022 मध्ये जाहीर केलेले नियम डावलून प्रमुख चौकात आणि रस्त्यालगत मोठ्या जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर प्रशासक जावळे यांनी शहरातील सर्व होल्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले. यात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नियमानुसार परवानगी नसल्यास अशी परवानगी रद्द करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत होर्डिंगबाबत सर्वेक्षणाचा अहवाल घेताच कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले शहरात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचा आकार व मंजूर ठिकाणांमध्ये असलेली तफावत परवानगी कालावधी संपुष्टात येऊनही बोर्ड न काढणे यासह इतर बाबींबाबत महापालिकेने सात दिवसांपूर्वीच शहरातील आठ जाहिरात संघटनांना नोटीस बजावल्या होत्या. त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली होती. आता शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आठ दिवसात सादर करण्याचे आदेश प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दिले आहेत.