अभिषेक कळमकर वर आणखी एक एफ. आय. आर. 22 वर्षीय तरुणी आली पुढे म्हणाली म्हणाली…

अभिषेक कळमकर संदर्भात आणखी एका तरुणीचा गंभीर आरोप

अहिल्यानगरमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधातील अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच्या गंभीर आरोपांनंतर आता आणखी एका तरुणीने पुढे येत तोफखाना पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी स्कार्फ घालून आलेली २२ वर्षीय तरुणी अचानक पोलीस ठाण्यात हजर झाली आणि पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार नोंदवली.

  1. अभिषेक कळमकर यांच्या संबंधित बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही तरुणी धाडसाने पुढे आली आणखी एका मुलीला नोकरीचे अमिष दाखवून त्याने आपली हवस शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
    निवडणुकीच्या काळात तिची कळमकर यांच्याशी ओळख झाली होती. त्या वेळी आपण नोकरीच्या शोधात असल्याचे तिने सांगितल्यावर “तुमचं काम मी करतो, आपण भेटू,” असे आश्वासन दिल्याचा दावा तरुणीने केला आहे.
    तरुणीच्या फिर्यादीनुसार, नंतर कळमकर यांनी तिला एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे गैरवर्तन करत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. याआधी समोर आलेल्या प्रकरणात ज्या प्रकारचे आरोप झाले होते, त्याच धर्तीवरचे कृत्य आपल्यासोबतही झाल्याचे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
    या नव्या तक्रारीनंतर पोलीस तपासाचा वेग वाढण्याची शक्यता असून, प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. राजकीय पातळीवरही या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
    या गुन्ह्यांच्या चर्चाबाबत सांगायचं तर — प्रकरण शांत होण्याऐवजी रोज नवे ट्विस्ट समोर येत आहेत. आता पोलिसांचा पुढचा तपास काय उलगडा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Kalamkar