अहिल्यानगर हादरलं – 7 वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, 4 जणांना अटक!
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात झाली असून अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा संतप्त आहे
. शाळेतच 7 वर्षीय मुलीवर शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. आनंदनगर, पावडी) यांनी गेल्या महिनाभरात अनेकदा अत्याचार केला, असं उघड झालं आहे. 1 ऑगस्ट रोजी मुलीने धैर्याने वडिलांना सत्य सांगितलं, पण मुख्य आरोपी फरार आहे 
.
धक्कादायक म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी गावातीलच काही प्रभावशाली लोकांनी पीडितेच्या कुटुंबाला धमक्या दिल्या
. “तक्रार केली तर गावात राहू देणार नाही” असा दबाव आणणाऱ्या राजेंद्र दराडे, रामनाथ दराडे, मूनवरखान पठाण आणि उमर नियाज पठाण या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे
.
संपूर्ण प्रकरणाचा धागा:
- शिक्षक फुंदे याने आधीही अशा घटना केल्या असून, राजकीय पाठबळाने प्रकरणे दाबली गेल्याची माहिती
. - यावेळीही तक्रार दडपण्यासाठी दबाव, पण सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड, अॅड. हरिहर गर्जे, हेरंब कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांनी पीडित कुटुंबाला उभारी दिली
. - प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने FIR दाखल करून चौघांना अटक केली.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात झाली असून अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार असून, त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झालं आहे
.
जनतेची मागणी:
नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा द्यावी
, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय द्यावा – अशी जोरदार मागणी होत आहे.
ही घटना फक्त एका कुटुंबावरचा हल्ला नाही, तर आपल्या समाजाच्या सुरक्षिततेवरचा थेट प्रश्न आहे. अशा लोकांना समाजात जागा नसावी हे स्पष्ट आहे
.
#JusticeForVictim 
#HangTheRapist 
#AkhilNagarNews 
#StopChildAbuse 
.
.