अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. 

अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी): मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई संचलित अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यशवंत कॉलनी तारकपूर अहिल्यानगर इथे ही शाळा अजून याचे वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. 
      शाळेच्या संचालिका सौ नीलांगी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संमेलनात विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात आणि विविध कला दर्शनातील उत्कृष्ट सादरीकरणामुळे संस्था चालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला.  
     प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गणेशजी जंगले, दादा चौधरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष येवले सर तसेच झकेरिया आघाडी स्कूलचे मुख्याध्यापक अन्सार शेख सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे सर हे होते. शाळेतील शिक्षक अविनाश विधाते सर, सुनिता मगर मॅडम, स्वप्नाली पलघडमल मॅडम, ऋतुजा माळी मॅडम, आयेशा शेख मॅडम, यांनी विद्यार्थ्यांचे विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम बसवून घेतले होते. 
    कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक नन्नवरे सर यांनी केला. सूत्रसंचालन वाघमारे मॅडम यांनी केले तर आभार अविनाश विधाते सर यांनी मानले.  
    यावेळी मुलांनी विविध धार्मिक, ऐतिहासिक तसेच बाल गीतांवर नृत्य सादर केली. दोन छोट्या नाटिका, गरबा नृत्य, भांगडा, बंगाली  व आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील विविधता या सादरीकरणातून दाखवण्यात आली. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, मार्गदर्शक प्रेरणास्थान प्रशांत गडाख, उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. संस्थेच्या संचालिका नीलांगी गडाख यांच्या कुशल संयोजनाखाली हे उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी होतात. या स्नेहसंमेलनात त्याची छाप सर्व ठिकाणी होती.