अहिल्यानगरमध्ये आरोग्य केंद्रांना मंजूरी

पण जागेअभावी तीन केंद्र रखडली!

🏥
अहिल्यानगरमध्ये आरोग्य केंद्रांना मंजूरी – पण जागेअभावी तीन केंद्र रखडली!
📍 मनपा जागेच्या शोधात; हजारो नागरिकांच्या आरोग्य सेवेवर परिणाम

Ahilyanagar News | शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांपैकी १३ सुरू झाली असली तरी उर्वरित ३ केंद्र जागेअभावी रखडली आहेत. 🙁

🏗️ महापालिका जागेच्या शोधात असून, जागा मिळाल्यानंतर तत्काळ प्री-फॅब्रिकेटेड इमारत उभारून सेवा सुरू केली जाणार आहे.


🩺 कुठं सुरू आणि कुठं रखडली?

✅ सुरू असलेली केंद्रे:
कल्याण रोड, बोल्हेगाव, तपोवन रोड, सिद्धार्थनगर, फराहबाग, निर्मलनगर, वैदूवाडी, नालेगाव, इंदिरानगर, अरणगाव रोड आदी ठिकाणी सेवा सुरू ✅

🔨 अंतिम टप्प्यात:
मुकुंदनगर, सूर्यानगर येथील केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात.

❌ रखडलेली केंद्रे:
शास्त्रीनगर (केडगाव), रामवाडी, रेल्वेस्थानक परिसर
➡️ शास्त्रीनगरमध्ये जागा आहे, पण नागरिकांचा विरोध
➡️ उर्वरित दोन ठिकाणी जागाच उपलब्ध नाही!


📢 महापालिकेकडे भुखंड असूनही आरोग्य सेवेसाठी जागा का मिळत नाही?
🤔 स्वस्त व मोफत आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे – मग ती मिळवण्यासाठी एवढी झगड का?

📌 प्रश्न अजूनही अनुत्तरित – आणि हजारो कुटुंबांची आरोग्य सुविधा रखडलेली!


🗣️ “राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १८ केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यातील १३ सुरू असून उर्वरित लवकरच सुरू होतील.”
– डॉ. सतीश राजूरकर, प्रभारी आरोग्य अधिकारी, मनपा