🏠✨ नगर शहरातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेत न्याय मिळावा !
नगर (प्रतिनिधी) – नगर शहरात अनेक गरीब आणि बेघर कुटुंबांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा वंचित कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले गेले आहे.