जिल्हा शल्यचिकित्सकांना अटकपूर्व जामीन
जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. ६) अतिदक्षता विभागला आग लागली. या भागात १७ रुग्णांवर उपचार मृत्यू झाला, तर सहा रुग्ण वाचविण्यात यश आले. नाशिक विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या आगीची चौकशी सुरु आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तोफखाना पोलीस दलाच्या वतीने तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रिजवान अहमद मुजावर यांच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. मिटके यांनी या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंता याना अटक केली आहे. या चौघींचा नियमित जामीन अर्ज ही न्यायालयाने फेटाळलेला आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्याची नोटीस काढली आहे. या अर्जावर पुढील सुनावणी ता: १७ रोजी होणार आहे. डॉ. पोखरणा यांच्या वतीने ऍड. प्रतीक कोठारी व ऍड. नंदिनी कोठारी यांनी काम पाहिले.