बाळासाहेब पवार स्मृती क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
बाल वयातच विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाचे धडे मिळणे गरजेचे - आमदार संग्राम जगताप
आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात एस.के. क्रिकेट अकॅडमी व १९ वर्ष वयोगटात समर्थ क्रिकेट अकॅडमी ठरले विजेता
बाल वयातच विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाचे धडे मिळणे गरजेचे – आमदार संग्राम जगताप
नगर ; बाल वयातच विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाचे धडे मिळणे गरजेचे आहे, यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बाळासाहेब पवार स्मृती करंडकच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले असल्याने ते आज राज्य पातळीवर क्रिकेट खेळत आहे, कै. बाळासाहेब पवार हे क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार असून त्यांनी नेहमीच खेळावरील प्रेम जोपासले होते, त्यांच्या विचाराने टर्फ विकेट वरचा क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू, क्रिकेट खेळात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे मात्र त्यासाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे, नगर मध्ये आता टर्फ विकेटचे मैदान निर्माण होत असून दर्जेदार खेळाडू घडण्यासाठी खेळाडूंनी लेदर बॉलच्या क्रिकेट खेळाला प्राधान्य द्यावे. कपिल पवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आपल्या वडिलांना खेळाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात एस.के. क्रिकेट अकॅडमी व १९ वर्ष वयोगटात समर्थ क्रिकेट अकॅडमी विजेता ठरल्याबद्दल आमदार संग्राम जगताप व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते क्रिकेट कप प्रदान करण्यात आला. यावेळी सी.ए अशोक पितळे, प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी, मुकेश मुळे, गौरव पितळे, ज्ञानेश चव्हाण, क्रॉम्प्टन कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अविनाश पाटील, कपिल पवार, निखिल पवार, सोमनाथ नजान, भरत पवार, डॉ. राहुल पवार, संदीप पवार, दिलीप पवार, श्रीकांत निंबाळकर, सागर बनसोडे, अरुण नाणेकर, जगन्नाथ ठोकळ, सुनील देवकर, गौतम शिंगी, हेमंत मुळे,नंदेश शिंदे, परमेश्वर पाटील, अभय शेंडगे, विलास साळूंखे, सम्राट देशमुख, प्रशांत मेहता, भूषण कडूस, श्रीपाद दगडे, देवेंद्र जोशी, सुजय दरेकर,प्रेम कांबळे अजय कविटकर आदींसह खेळाडू उपस्थित होते, उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मुलींसाठीही लेदर बॉलवरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करावे यासाठी आपचे सहकार्य राहील, टर्फ विकेटच्या माध्यमातून क्रिकेटर तयार होत असतो त्यासाठी टर्फ विकेटची निर्मिती होण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर भागात खेळाडूंसाठी क्रीडा संकुलचे काम सुरु आहे, नगर जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा असून पिंक बॉलवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालन कपिल पवार यांनी केले. व आभार प्रमिला सुपेकर यांनी मानले. अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करडंक जिल्हा स्तरीय लेदरबॅाल क्रिकेट स्पर्धाचा पहिला अंतिम सामना 14 वर्षाखालील मुलांचा एस के क्रिकेट अकादमी विरूद्ध समर्थ क्रिकेट अकादमी यांच्यात झाला. ह्या अंतिम सामन्याचा टॅास जिल्हा परिषद (माध्यमिक) अ.नगरचे शिक्षणअधिकारी अशोकराव कडूस यांच्या हस्ते झाले.एस के क्रिकेट अकादमी संघाने हा सामना सात गडी राखुन जिंकून बाळासाहेब पवार 14 वर्षाखालील स्मृती करडंक पटकावला. यात समर्थ क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली. प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 83 धावा केल्या .
अभिराम गोसावी 25 धावा, अमेय गायकवाड नाबाद 15 धावा केल्या. आदित्य भापकर 14 धावा, जय गोंदकर, अभय कोतकर यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले ,तन्मय कोल्हे, डी शौर्या प्रत्येकी एक,एक बळी मिळविला. कुशल पाटील याने 14 धावांत 3 बळी घेतले. एस के क्रिकेट अकादमी संघाने 17. 2 षटकात 3 बाद 86 धावा केल्या
डी शौर्या याने नाबाद 31 धावा केल्या तसेच जय गोंदकर याने 20 धावा केल्या .गोलंदाजी समर्थ क्रिकेट अकादमी
अभिराम गोसावी 15 धावांत 2 बळी घेतले .सामानावीर म्हणून एस के क्रिकेट अकादमी संघाचा कुशल पाटील याची निवड झाली.
स्पर्धेचा दुसरा अंतिम सामना १९ वर्षाखालील मुलांच्या समर्थ क्रिकेट अकादमी विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी यांच्यात झाला. या सामन्याचा टॅास आनंदऋषीजी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॅा. अनिकेत कटारिया यांच्या हस्ते झाला. समर्थ क्रिकेट अकादमी संघाने हा सामना 20 धावांनी जिंकून 19 वर्षाखालील बाळासाहेब पवार स्मृती करडंक उंचावला. समर्थ क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली, ऋषिकेश दौंड 53 धावा ,स्वरुप मोरे 42 धावा ,तर रवि शंकर गिरवलकर याने नाबाद 26 धावा केल्या, गोलंदाजी प्रियदर्शनी, अंकुश प्रजापती 31 धावांत 2 बळी मिळविले तर ,विशाल यादव , सार्थक फरगडे यानी एक एक बळी मिळविला.
प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 7 बाद 128 धावा केल्या, प्रणय सिसवाल याने 55 चेंडूत 62 धावा केल्या .तनिष आमने 13 धावा , श्रेयान बोरावके याने नाबाद 12 धावा केल्या, गोलंदाजी समर्थ क्रिकेट अकादमी, जयेश जायभाय याने 21 धावांत 3 बळी घेतले, निमेश शिदोरे , ओम पाटील यांनी प्रत्येकी दोन.-दोन.बळी मिळविले, सामनावीर म्हणून समर्थ क्रिकेट अकादमी संघाचा जयेश जायभाय याची निवड करण्यात आली.
मुलींच्या प्रदर्शनीय सामन्यातील वुमन ऑफ द मॅच-स्वामिनी बेलेकर
१४ वर्षाखालील स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके-
मॅन ऑफ द सिरीज-अभय कोतकर
बेस्ट बॉलर-अभिराम गोसावी
बेस्ट बॅट्समन- राघव नाईक
१९ वर्षाखालील स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके-
मॅन ऑफ द सिरीज-अंकुश प्रजापती
बेस्ट बॉलर-प्रज्वल पंधारे
बेस्ट बॅट्समन- प्रणय सिस्वाल