मोठा धडाका! मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी शहरात शरीरास अपायकारक मावा विक्रीच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने भव्य धाड टाकत तब्बल ₹२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोठा धडाका! मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त! ![🚨]()
![🔥]()
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी शहरात शरीरास अपायकारक
मावा विक्रीच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने भव्य धाड टाकत तब्बल ₹२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
२६ ऑगस्ट रोजी पाथर्डीमध्ये पथकाला माहिती मिळाली की, ओयो बाईक शोरुमजवळ एक व्यक्ती माव्याच्या पुड्या विक्री करत आहे. तातडीने छापा मारला असता अक्षय गणेश विधाटे (रा. शिवशक्तीनगर, पाथर्डी) हा विक्री करताना रंगेहात पकडला गेला. त्याच्या जवळून ५० पुड्या जप्त करण्यात आल्या.
चौकशीत त्याने कबुली दिली की, तो मावा आष्टी तालुक्यातील सावर्गाव घाट येथील शेडमध्ये मशीनद्वारे तयार करत होता. पथकाने तत्काळ तिथे धाव घेतली. तेथे काही जण सुंगधीत तंबाखू आणि सुपारी मिसळून मावा तयार करताना सापडले.
पकडलेले आरोपी –
-
शुभम विकास पारखे (रा. रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी)
-
रियाज नजिर बेग (रा. चिंचपुर रोड, पाथर्डी)
-
अनिल भाऊ काळोखे (रा. कोरेगाव रोड, पाथर्डी)
-
अक्षय गणेश विधाटे (रा. शिवशक्तीनगर, पाथर्डी)
-
इस्माईल हुसेन शहा (रा. नाथनगर, पाथर्डी)
तर आदित्य भास्करे (रा. एमआयडीसी, बीड) फरार आहे.
या ठिकाणावरून पोलिसांनी तयार मावा, तंबाखू, मिक्सिंग मशिनरी, पॅकिंग साहित्य आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹२५,४८,९३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच, पाथर्डीतील माणिकदांडी रोडवर इस्माईल शहा हा दुचाकीवर बसून मावा विक्री करताना पकडला गेला. त्याच्याकडून माव्याच्या पुड्या आणि प्लॅटीना मोटारसायकल जप्त करून आणखी ₹३१,९५० चा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईवरून गुन्हा रजि नं. ९०७/२०२५ आणि ९१०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. हरिष भोये, अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, सागर ससाणे, हृदय घोडके यांनी सहभाग घेतला.
ही मोठी धडक कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांना आवाहन –
शरीरास अपायकारक
मावा, सुंगधीत तंबाखू यामुळे तरुणाईच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होत आहे. अशा अवैध धंद्याची माहिती त्वरित पोलिसांना द्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहकार्य करा.
Metro News पोर्टलच्या माध्यमातून ही बातमी शेअर करत आहोत. आपल्या मित्रपरिवारात ही बातमी
शेअर करा, कारण गुन्हेगारीविरुद्ध समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे! ![✊]()

मोठा धडाका! मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त!
मावा विक्रीच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने भव्य धाड टाकत तब्बल ₹२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
२६ ऑगस्ट रोजी पाथर्डीमध्ये पथकाला माहिती मिळाली की, ओयो बाईक शोरुमजवळ एक व्यक्ती माव्याच्या पुड्या विक्री करत आहे. तातडीने छापा मारला असता अक्षय गणेश विधाटे (रा. शिवशक्तीनगर, पाथर्डी) हा विक्री करताना रंगेहात पकडला गेला. त्याच्या जवळून ५० पुड्या जप्त करण्यात आल्या.
चौकशीत त्याने कबुली दिली की, तो मावा आष्टी तालुक्यातील सावर्गाव घाट येथील शेडमध्ये मशीनद्वारे तयार करत होता. पथकाने तत्काळ तिथे धाव घेतली. तेथे काही जण सुंगधीत तंबाखू आणि सुपारी मिसळून मावा तयार करताना सापडले.
या ठिकाणावरून पोलिसांनी तयार मावा, तंबाखू, मिक्सिंग मशिनरी, पॅकिंग साहित्य आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹२५,४८,९३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईवरून गुन्हा रजि नं. ९०७/२०२५ आणि ९१०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोठी धडक कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांना आवाहन –
Metro News पोर्टलच्या माध्यमातून ही बातमी शेअर करत आहोत. आपल्या मित्रपरिवारात ही बातमी
शेअर करा, कारण गुन्हेगारीविरुद्ध समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे! 