
FD करणाऱ्यांसाठी BIG अपडेट! 
सुरक्षित गुंतवणुकीसाठी लाखो लोक ज्याला प्राधान्य देतात ती योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट (FD). पण 2025 हे वर्ष FD करणाऱ्यांसाठी थोडंसं चिंताजनक ठरत आहे. कारण देशातील बँकांनी गेल्या काही महिन्यांत FD व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे.
आरबीआयने रेपो रेटमध्ये 1% कपात केल्यानंतर बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले. त्याचाच परिणाम आता FD करणाऱ्यांना भोगावा लागत आहे.
नुकतंच देशातील कॅनरा बँकेने फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात घट केली आहे. या बदलामुळे FD करणाऱ्या ग्राहकांचा धक्का बसला आहे.
काय आहेत कॅनरा बँकेचे नवे FD रेट्स?
सामान्य ग्राहकांसाठी – 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या FD वर व्याजदर आता 3.25% ते 6.50% दरम्यान राहणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी – त्यांना 50 बेसिस पॉईंट्सने जास्त म्हणजेच 3.75% ते 7% व्याज मिळणार.
विशेष म्हणजे 444 दिवसांच्या FD वर –
सामान्य ग्राहकांना 6.50%
सिनिअर सिटीजनना 7% व्याज
म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडासा फायदा असला तरी सामान्य ठेवीदारांसाठी हा बदल मोठा फटका आहे.
सेव्हिंग अकाउंटवरही फटका!
फक्त FD वरच नाही, तर सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदर देखील कमी झाले आहेत.
आता ठेवीदारांना त्यांच्या शिल्लक रकमेनुसार 2.55% ते 4% व्याज मिळेल.
पूर्वी हा दर 2.70% ते 4% होता.
याचा अर्थ काय?
FD करणाऱ्यांना यंदा कमी रिटर्न मिळणार
नवीन FD करणाऱ्यांनी नीट विचार करूनच गुंतवणूक करावी
सेव्हिंग अकाउंटमधील व्याजही घटल्याने ग्राहकांना तोटा
सोशल मीडियावर या बदलामुळे FD करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी आणि चर्चा रंगली आहे.
काही नेटिझन्स म्हणतायत –
“FD सुरक्षित असली तरी आता परतावा कमी, मग पर्याय कोणते?” 
तर काही ज्येष्ठ नागरिक सुटकेचा श्वास सोडतायत कारण त्यांना अजूनही थोडं जास्त व्याज मिळतंय. 
तुम्ही काय म्हणता?
FD करणं अजूनही फायदेशीर आहे का?
की आता म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट किंवा इतर पर्याय विचारात घ्यायला हवेत?
कमेंटमध्ये तुमचा विचार नक्की शेअर करा! 

#CanaraBank #FDUpdate #BankingNews #InvestmentTips #MetroPortal
काय आहेत कॅनरा बँकेचे नवे FD रेट्स?
सेव्हिंग अकाउंटवरही फटका!
याचा अर्थ काय?