BJP Accepts Resignation of ‘Tiger’ T. Raja Singh!
तेलंगणातील गोशामहलमध्ये राजकीय भूकंप!


तेलंगणातील गोशामहलमध्ये राजकीय भूकंप!
तेलंगणाचे आक्रमक हिंदुत्ववादी नेते टी. राजा सिंह यांनी भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता – आता बीजेपीने तो स्वीकारलाय! 
कसला होता वाद?
३० जून रोजी तेलंगणा भाजप अध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची निवड झाल्यावर राजा सिंह चिडले!
“पक्षाने कार्यकर्त्यांची मतं डावलून चुकीचं नेतृत्व निवडलं” – असा थेट आरोप त्यांनी केलाय.
कोण आहेत राजा सिंह?
गोशामहलमधून सलग तीन वेळा आमदार – 2014, 2018 आणि 2023
कट्टर हिंदुत्ववादी नेता – गोरक्षण, श्री राम युवा सेना, बजरंग दलशी नाते
अनेक वादग्रस्त विधानं, पैगंबर मोहम्मद वादामुळे अटकही
भाजपने निलंबन केलं होतं – पण 2023 निवडणूकपूर्वी पुन्हा सामावून घेतलं
गोशामहल – हैदराबादमधील हिंदूबहुल मतदारसंघ, जिथे AIMIMचे असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत.
आता भाजपा आणि राजा सिंह यांचं नातं संपलंय!
पुढचं पाऊल काय? स्वतःचा पक्ष? की नवीन संघटना?
नजर ठेवा – तेलंगणात मोठी राजकीय हालचाल होऊ शकते!