ISDT मध्ये ‘Vastu’ सर्टिफिकेट कोर्सची धमाकेदार एन्ट्री!

इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, डिझायनर्ससाठी खास संधी!

🚨
 ISDT मध्ये ‘Vastu’ सर्टिफिकेट कोर्सची धमाकेदार एन्ट्री!

इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, डिझायनर्ससाठी खास संधी!

अहिल्यानगर – डिजाईन क्षेत्रात शिक्षणाची नवी दारे उघडत ISDT (Institute for Studies in Design and Technology) ने आता वास्तुशास्त्र सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे! संस्थेचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही माहिती दिली असून, कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

ISDT च्या वार्षिक नियोजन बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी संचालिका पूजा देशमुख, प्राचार्य अरुण गावडे, विभागप्रमुख पूजा पतंगे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

वास्तु कोर्स ही इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, डिझायनर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांच्यासाठी खास मागणी होती – म्हणून यंदापासून अल्पमुदतीचा कोर्स सुरू करत आहोत,”
— विनायक देशमुख, अध्यक्ष – ISDT

📚 कोर्स डिटेल्स:

  • कालावधी: 2 महिने
  • वर्ग: फक्त शुक्रवार आणि शनिवार
  • योग्य वेळेचा विचार करून, वर्किंग प्रोफेशनल्ससाठी खास डिझाईन

प्राचार्य अरुण गावडे म्हणाले, “कोर्समध्ये थिअरी + प्रॅक्टिकल + वास्तु क्षेत्रातील तज्ञांच्या गेस्ट लेक्चर्स असतील. ज्यांना वास्तुशास्त्र शिकायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा!”

📞 संपर्क: 0241-2430023

🏢 ISDT ची 22 वर्षांची शैक्षणिक वाटचाल

ISDT ने डिझाईन आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात 21 यशस्वी वर्षे पूर्ण केली असून, आता 22 व्या वर्षात प्रवेश केला आहे. संस्थेने आजवर फॅशन डिझाईनइंटेरिअर डिझाईन कोर्सेससह ब्लॉसम फॅशन शो, वर्कशॉप्स, इंडस्ट्री विजिट्स यासारखे इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवले आहेत.

या बैठकीत महेश बालटे, चेतन वाडेकर, प्रणव भोसले, निकिता बेद्रे, कोमल वांडेकर, पूर्वा भंडारी यांनी सहभाग घेतला. नियोजनाची जबाबदारी रोहन चारगुंडी यांनी पार पाडली.