BREAKING | अहिल्यानगर पोलिसांचा धडाका!
अहिल्यानगर : जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचा मोठा हल्ला!
BREAKING | अहिल्यानगर पोलिसांचा धडाका!
सोनई आणि तालुक्यातील 6 अवैध दारू अड्ड्यांवर छापे – ₹50,980 किमतीची दारू जप्त
अहिल्यानगर : जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचा मोठा हल्ला! ![👮♂️]()
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल 6 अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत एकूण ₹50,980 किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली असून आरोपींवर 6 गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समुळ उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
पथकात पोहेकॉ राहुल द्वारके, गणेश लबडे, सुयोग सुपेकर, पोना रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, अमोल अजबे, प्रकाश मांडगे, योगेश कर्डीले, मपोकॉ सारिका दरेकर व चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.
दिनांक 23 ऑगस्ट रोजी या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापे घातले. यात –
-
अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत 2 गुन्हे दाखल, मुद्देमाल ₹8,480 जप्त
-
सोनई पोलीस ठाणे हद्दीत 4 गुन्हे दाखल, मुद्देमाल ₹42,500 जप्त

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समुळ उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
पथकात पोहेकॉ राहुल द्वारके, गणेश लबडे, सुयोग सुपेकर, पोना रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, अमोल अजबे, प्रकाश मांडगे, योगेश कर्डीले, मपोकॉ सारिका दरेकर व चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.
दिनांक 23 ऑगस्ट रोजी या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापे घातले. यात –
अशा प्रकारे एकूण 6 ठिकाणी छापे टाकून ₹50,980 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या धडक मोहिमेचे कौतुक केले असून पुढेही अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.