BREAKING | उत्तरकाशी ढगफुटीचा थरार!

१५० जणांची सुटका, लष्कराचे ११ जवान बेपत्ता – बचावकार्यात रात्रीचा थरार!

🛑
BREAKING | उत्तरकाशी ढगफुटीचा थरार!

१५० जणांची सुटका, लष्कराचे ११ जवान बेपत्ता – बचावकार्यात रात्रीचा थरार!

उत्तरकाशी | 6 ऑगस्ट (Metro News)

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी भीषण ढगफुटीमुळे (Cloudburst) घराली गावात अचानक पूर आला आणि गावात हाहाकार माजला! एनडीआरएफच्या तुफानी मदतकार्यात आतापर्यंत १५० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, लष्कराचे ११ जवान अद्याप बेपत्ता आहेत.

🚨 हिमाचल प्रदेशातही थरार
किन्नौर कैलाश यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या ४१३ यात्रेकरूंचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

📍 NDRF टीम अडकल्या!
एनडीआरएफचे अधिकारी मोहसेन शाहेदी यांनी सांगितले की, घरालीकडे निघालेल्या तीन तुकड्यांना दरड कोसळल्याने महामार्गावर अडथळा आला आहे. हवामानामुळे डेहराडूनहून आणखी दोन तुकड्या पाठवता आल्या नाहीत.

🚁 बचाव कार्यात पूर्ण ताकदीनं लष्कर, ITBP, SDRF सक्रिय!

📌 मंगळवारी आलेल्या नैसर्गिक संकटात ४ नागरिकांचा मृत्यू, तर ५० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हरसिल परिसरातून लष्कराचे काही जवानही अद्याप संपर्काबाहेर आहेत.

🌊 पूराचा कहर, पण आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचं NDRF ने स्पष्ट केलं आहे.


 

🔥 सोशल मीडियावर शेअर करा – ही बातमी तुम्हालाही हलवून टाकेल!