✅ BREAKING UPDATE | जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना FINAL! 🗳️🔥
अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्यात आली
BREAKING UPDATE | जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना FINAL! ![🗳️]()
![🔥]()



अखेर ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती ती बातमी आता कन्फर्म झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार व नाशिक विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर अहिल्यानगर
अधिकृतरीत्या प्रकाशित होणार आहे.
ही रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलक, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांना आता प्रत्यक्षात ही अंतिम प्रभाग रचना बघता येणार आहे.
ग्रामविकास विभागाने याबाबत १२ जून २०२५ रोजी आदेश जारी केला होता. त्यानुसार उद्या, २२ ऑगस्ट २०२५ रोजी ही रचना प्रकाशित होणार असल्याची अधिकृत माहिती उपजिल्हाधिकारी महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी दिली आहे.
या रचनेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा संपूर्ण खेळ बदलणार आहे. कारण प्रत्येक पक्ष, कार्यकर्ते आणि नेत्यांची गणिते या नव्या प्रभाग रचनेवर अवलंबून राहणार आहेत. 
ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींमध्ये यावरून चर्चा रंगल्या आहेत. कोणत्या गावांचा कोणत्या प्रभागात समावेश झाला आहे? कोणत्या भागात आरक्षण लागू झाले आहे? हे सगळं पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

विशेष म्हणजे, प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आता या रचनेनुसार होणार असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. पक्ष आपले उमेदवार ठरवताना या रचनेचा बारकाईने अभ्यास करणार आहेत.
उद्यापासून सोशल मीडिया, राजकीय बैठक आणि गावोगावी चर्चा फक्त ह्याच FINAL प्रभाग रचनेवर होणार हे नक्की!
तर मित्रांनो, लक्ष ठेवा #MetroPortal वर कारण उद्या तुम्हाला या FINAL प्रभाग रचनेबद्दल सविस्तर माहिती आणि विश्लेषण आम्ही देणार आहोत.