BREAKING | विमान अपघात, भाडे वाढ आणि सुरक्षा प्रश्नांवर संसदेत खळबळ – PAC कडून नागरी विमान सुरक्षा ब्युरोच्या ऑडिटची मागणी!
काय घडलं? अहमदाबाद विमान अपघात आणि पहलगाम हल्ल्यानंतर अचानक वाढलेल्या विमान भाड्यांवरून संसद समिती (PAC) चांगलीच आक्रमक झाली आहे. सुरुवातीला विमानतळ शुल्कांवर चर्चा अपेक्षित होती, पण अपघात व सुरक्षा मुद्द्यांमुळे बैठक तणावपूर्ण झाली.

काय घडलं?
अहमदाबाद विमान अपघात आणि पहलगाम हल्ल्यानंतर अचानक वाढलेल्या विमान भाड्यांवरून संसद समिती (PAC) चांगलीच आक्रमक झाली आहे. सुरुवातीला विमानतळ शुल्कांवर चर्चा अपेक्षित होती, पण अपघात व सुरक्षा मुद्द्यांमुळे बैठक तणावपूर्ण झाली.
समितीच्या महत्त्वाच्या मागण्या:
Air India Dreamliner अपघाताची चौकशी करा
Black Box डेटा खुला करा
विदेशी तज्ञांची मदत घ्या
भाडे नियंत्रण धोरण ठरवा
BCAS कडून खास सुरक्षा ऑडिट घ्या
भाडेवाढीवर खासदार संतप्त!
पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून दिल्ली-मुंबईसारख्या शहरांना जाणाऱ्या फ्लाइट्सचे भाडे अचानक वाढले. DGCA ने भाडेवाढ रोखण्यासाठी अॅडवायजरी काढली, पण खासदारांचा सवाल – “पाळलं तरी किती?”
PAC ची स्पष्ट मागणी:
“सुरक्षा मानकात त्रुटी आहेत, सुधारणा करा. तपासाचा अहवाल लोकांसमोर आणा.”
एअर इंडियाचं उत्तर:
“Dreamliner हे जगातलं सर्वात सुरक्षित विमान आहे.”