माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरसाठी पंचवीस हजार रुपयाची रोख मदत
युवकांच्या पुढाकारातून सोमेश्वर कोवीड सेंटर
चांदा
नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय मध्ये नुकतेच चांदा गावातील युवकांच्या पुढाकारातून व सामाजिक संघटनेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे त्यासाठी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने मदत हळूहळू येत आहे
चांदा येथील जवाहर विद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पंचवीस हजार रुपये रोख मदत देण्यात आली
सध्या कोरोणाने देशात धुमाकूळ घातला असून यामध्ये अनेक रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत आणि यांना वाचवण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून चांदा येथील युवकांच्या पुढाकारातून सोमेश्वर कोवीड सेंटर चालू केले असुन, त्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक संतोष कानडे, आबासाहेब शेळके,संदीप जावळे, जितेंद्र शिंदे, सोपान चौधरी, प्रशांत शेटे, प्रवीण सावंत, राहुल दहातोंडे, प्रशांत बोरुडे, राजेंद्र क्षिरसागर, सोपान शेळके, धीरज मनोच्या, प्रदीप दहातोंडे, अशोक जावळे हे या प्रसंगी उपस्थित होते.
या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कोवीड सेंटरसाठी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली सागर अनेचा बबन विठ्ठल गवळी यांनी देखील या साठी अर्थीक मदत दिली या प्रसंगी देविदास पासलकर, बाळासाहेब जावळे, पोलीस पाटील कैलास अभिनव, सुनील भगत, किरण जावळे, अमोल मरकड ,सत्यानंद दिवटे, संतोष बोरुडे, सादिक शेख, बबलू काळुंगे, तुशार जोशी हे या प्रसंगी उपस्थित होते . अनेक युवक अहोरात्र कोवीड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करीत आहे.