कोपरगावात समृद्धीवर ACTION!
लाखोंचा गुटखा ट्रकसकट जप्त! कोपरगाव परिसरात समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक पकडला!

लाखोंचा गुटखा ट्रकसकट जप्त!
कोपरगाव परिसरात समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक पकडला!
शिर्डी इंटरचेंजवर झालेल्या या कारवाईत तब्बल ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे!
हा गुटखा काही माल अहिल्यानगर जिल्ह्यात आणि काही भिवंडी-मुंबईकडे रवाना होणार होता. पण पोलिसांनी अचूक माहितीवरून धडक कारवाई करत सगळा खेळ बिघडवला!
SP सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली
DySP संतोष खाडे यांच्या स्पेशल टीमने ही धमाकेदार अॅक्शन घेतली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे!