डिजिटल दाखल्यांअभावी नागरिकांची ससेहोलपट! पारनेर ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक ठप्पा!
डिजिटल दाखले मिळत नाहीत
डिजिटल दाखल्यांअभावी नागरिकांची ससेहोलपट! पारनेर ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक ठप्पा!
#ParnerProblems #NoDigitalCertificate
पारनेर | विशेष प्रतिनिधी
पारनेर ग्रामीण रुग्णालयातील जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी विभाग सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. डिजिटल दाखले मिळत नाहीत, आणि प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांशिवाय नागरिकांची प्रचंड हेळसांड सुरू आहे.
पूर्वी हे दाखले पारनेर नगर पंचायतकडून ऑफलाइन पद्धतीने दिले जात होते. पण आता जबाबदारी ग्रामीण रुग्णालयावर आली असताना, डिजिटल पद्धत पूर्ण ठप्प आहे. ना वेबसाइट कार्यरत, ना सेवा तत्काळ. परिणामी, नागरिक सरकारी, सामाजिक आणि धार्मिक कामांसाठी अडकून पडले आहेत.
वेबसाईट डाऊन, सेवा बंद!
“माझ्या कुटुंबाला धार्मिक यात्रेसाठी मक्का-मदिनाला न्यावंय, त्यासाठी मला विवाह नोंदणीचा डिजिटल दाखला हवा आहे. पण ग्रामीण रुग्णालयात वेबसाइटच नाही, मग मी काय करू?“, असा सवाल करत रमीज राजे या नागरिकाने आपली अडचण मांडली.
उपोषणाची तयारी
योगेश मते, पाणीपुरवठा सभापती म्हणाले, “शहरातील नागरिकांचे हे प्रश्न गांभीर्याने घ्या. आम्ही लाक्षणिक उपोषण करणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. डिजिटल सुविधा तातडीने सुरू कराव्यात.”
प्रशासनाकडून सैरभैर स्थिती
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, “वेबसाईट अजून कार्यरत नाही. विषय मासिक बैठकीत घेतला आहे.” पण निर्णय होत नाही, आणि त्रास मात्र नागरिकांना.
मागणी काय?
- डिजिटल दाखल्यांसाठी वेबसाइट सुरू करावी
- सेवा तत्काळ उपलब्ध करावी
- लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाशी बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढावा
पारनेरकरांसाठी एकच हाक – डिजिटल दाखले मिळालेच पाहिजेत!
#DigitalDakhlaNow #ParnerHospitalIssue #OnlineServiceMatters
अपडेटसाठी फॉलो करा – मेट्रो पोर्टल

वेबसाईट डाऊन, सेवा बंद!
उपोषणाची तयारी
प्रशासनाकडून सैरभैर स्थिती
मागणी काय?